हरित क्रांतीचे प्रणेते , भारताचे माजी उपपंतप्रधान , दलित नेते , दिवंगत डॉ . बाबू जगजीवनराम यांची ११६ वी जयंती बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली . या निमित्ताने , शहरात , डॉ . बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली .
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ , दिवंगत डॉ . बाबू जगजीवनराम त्यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ . नितेश पाटील , जिल्हा पंचायत सीईओ हर्षल , तसेच एसपी डॉ . संजीवकुमार पाटील यांनी पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ केला .

यानंतर , सजवलेल्या रथातून, बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेची ही सवाद्य मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होऊन , चन्नम्मा सर्कल , एपीएमसी रोड , मार्गे संगमेश्वर नगरातील बाबू जगजीवनराम उद्यानात नेण्यात आली .
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, चर्मकार समाजाचे अध्यक्ष रवी शिंदे , बाबू पुजारी , यलाप्पा हुदली , सुधीर चौगुले , शिवराज सौदागर , विनोद सोलापूर , चंद्रकांत चव्हाण आणि अन्य समाजबांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते .


Recent Comments