बेळगाव शहरातील कंग्राळ गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व सरपंच म्हणून काम करीत असलेले अनंतराव धाकलू जाधव (वय ८७ )यांचे बुधवारी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, एक कन्या सूना नातवंडे असा परीवार आहे. गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ ते गल्लीतील पंचमंडळात कार्यरत होते. शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव, गल्लीचे सर्व धार्मिक विधी, महाप्रसाद अशा कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता. वेताळ देवस्थान ,छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे कामकाज ते पहात होते. गल्लीतील पंचमंडळ सल्लागार व नागरिक यांच्याबरोबर गल्लीच्या प्रश्नाबाबत ते सतत चर्चा करीत असत.


Recent Comments