हिरेबागेवाडी टोल गेटवर योग्य कागदपत्रांशिवाय खासगी बसमधून नेण्यात येत असलेली दोन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली.
बुधवारी पहाटे 3.30 च्या सुमारास मुंबईहून बंगळुरकडे जाणाऱ्या कॅनरा पिंटो कंपनीच्या खासगी बसची (KA 70 1459) एफएसटीचे पथक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली असता एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध रक्कम आढळून आली. याचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी घेतला. यासंदर्भात कर्नाटक पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
डीसीपी स्नेहा, ग्रामीण एसीपी गोपालकृष्ण गौडा, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राजशेखर डंबळ, हिरेबागेवाडीचे सीपीआय अमरेश, एफ.एस.टी. शंभुलिंगप्पा, राजेंद्र मोराबद यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी पोलीस आणि एफएसटी पथकाच्या कार्याचे कौतुक केले.


Recent Comments