Belagavi

एससी विभाग काँग्रेसला राज्यात 128 पेक्षा अधिक जागा जिंकून देणार : आर. धर्मसेन

Share

काँग्रेस नेत्यांनी पक्षाने निवडणुकीत 128 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु, पक्षाच्या अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य मागासवर्ग विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनी त्यांहीं अधिक जागा जिंकून कर्नाटकाच्या माध्यमातून देशाला एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेस एससी विभाग राज्याध्यक्ष आर. धर्मसेन यांनी सांगितले.

बेळगावातील काँग्रेस भवनात काँग्रेस एससी बेळगाव विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेस एससी विभाग राज्याध्यक्ष आर. धर्मसेन म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 4 विभागात कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागातर्फे पक्ष संघटन आणि एससी कार्यकर्त्यांची सदस्य नोंदणी अभियान जोरात सुरु केले आहे. गेल्यावर्षी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून 13 हजारहून अधिक एससी पदाधिकारी राज्यभरात नोंदणी केली आहे. म्हैसूर आणि बेंगळूर विभागात पक्ष मजबुतीसाठी मोहीम राबविण्यात आली असून, आज बेळगाव आणि उद्या कलबुर्गी विभागात मोहिमेला चालना देण्यात येणार आहे. 25 हजारहून अधिक पदाधिकारी व सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील 36 मतदार संघांपैकी 25 हून अधिक मतदार संघांत काँग्रेसला विजयी करण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत आहोत असे त्यांनी सांगितले.


राज्यातील एच. सी. कोटे मतदार संघांप्रमाणे काही मतदार संघात एससी लोकसंख्या जास्त असूनही ते मतदार संघ एसटीसाठी राखीव झाले आहेत. अशा मतदार संघात काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या विजयासाठी एकसंघपणे काम करणार असल्याचे धर्मसेन यांनी सांगितले. काँग्रेस एससी विभागाने “दलितांचे पाऊल काँग्रेसकडे” ही मोहीम प्रभावीपणे राबवली आहे. त्यातून राज्यातील सर्व दलित नेत्यांनी नॅशनल कॉलेज ग्राऊंडच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या मेळाव्यात या निवडणुकीत काँग्रेसला समर्थन जाहीर केले आहे. राज्यात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या तसेच या भागात केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, एच. के. पाटील आदी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अनुसूचित जाती विभाग कठोर परिश्रम घेऊन राज्यात काँग्रेसला 128 हुन अधिक जागा जिंकून घेण्यासाठी प्रयत्न करेल असे आर. धर्मसेन यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, मल्लेश चौगुले, जक्कप्पन्नावर, हिंडसगेरी, प्रकाश, प्रदीप, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम खतीब आदी उपस्थित होते.

Tags: