Belagavi

उडुपीचा नित्यानंद कोटियन प्रीतम चौगुले क्लासिकचा मानकरी

Share

कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रीतम चौगुले क्लासिक राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत , उडुपीच्या नित्यानंद कोटियन याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘किताब पटकाविला .

तर , बेळगावचा विकास सूर्यवंशी उपविजेता ठरला . तसेच उमेश गंगाने याने बेस्ट पोझरचा बहुमान पटकावला . विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेत , आकाश इअग्रणी , उमेश गंगाने , रतीलकुमार , प्रताप कालकुंद्रीकर , सर्वनन एच , शंकर होन्नावर , नित्यानंद कोटियन , तसेच विकास सूर्यवंशी यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला .

प्रारंबी स्पर्धेचे उदघाटन , मिस्टर इंडिया आणि मिस्टर एशिया सुहास खामकर , यांच्या हस्ते करण्यात आले . बेळगाव कतसेच बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुहास खामकर , प्रीतम चौगुले आणि सुनील आपटेकर , प्रसाद घोरपडे, अजित सिद्धण्णावर , एम के गुरव , एम गंगाधर , आदी उपस्थित होते . या सर्वांच्या हस्ते , बक्षिसे देण्यात आली .

 


				

Tags: