Belagavi

शांताई विद्याआधार उपक्रमाला आयएमईआरतर्फे जुनी वर्तमानपत्रे आणि मासिके देणगी

Share

बेळगावातील केएलएस संस्थेच्या आयएमईआरतर्फे शांताई विद्याआधार उपक्रमाला जुनी वर्तमानपत्रे आणि मासिके देणगीदाखल देण्यात आली.

शांताई विद्याआधार उपक्रमातुन वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्यात येतो. समाजातील जे विध्यार्थी त्यांच्या शिक्षणासाठी फी भरू शकत नाहीत अशाना मदत करण्यात येते. आजपर्यंत असे 480 विध्यार्थ्यानी या उपक्रमाच्या मदतीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर पदवी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयएमईआर शांताई विद्याआधार उपक्रमाशी जवळपास 8 वर्षांपासून संलग्न आहे. नुकतीच आयएमईआरतर्फे शांताई विद्याआधार उपक्रमाला वर्तमानपत्रे आणि

मासिके यांची 1000 किलो पेक्षा जास्त रद्दी देणगीदाखल देण्यात आली. याबद्दल माजी महापौर व समाजसेवक विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ममदापूर यांनी आयएमईआरचे आभार मानले. दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्याचे महत्त्व सांगितले.


आयएमईआर संचालन समितीचे अध्यक्ष ऍड. आर. एस. मुतालिक यांनी यावेळी उपस्थित राहून या उपक्रमाला यापुढेही मदत देण्याचे आश्वासन दिले. केएलएस आयएमईआरचे संचालक डॉ. आरिफ शेख यांनी कौतुक केले.

सुनील कुलकर्णी, डॉ. शैलजा हिरेमठ यांनी संयोजन केले. डॉ. श्रीकांत नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: