बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात इच्छुक युवकांना अनेक संधी आहेत. व्यसनांपासून दूर राहून, कठोर मेहनत घेऊन युवकांनी या क्षेत्रात करिअर करावे असे आवाहन मि. वर्ल्ड बॉडी बिल्डर सुहास कामकर यांनी केले.
प्रीतम चौगुले क्लासिक-2023 शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने मि. वर्ल्ड बॉडी बिल्डर सुहास कामकर यांनी आज बेळगावला भेट दिली. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, बेळगावात बॉडी बिल्डिंग स्पर्धा योजित केल्या जातात ही आनंदाची बाब आहे. दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे. त्यामुळे नवोदित बॉडी बिल्डर्सना प्रेरणा मिळेल, व्यासपीठ उपलब्ध होईल. त्याशिवाय समाजातही एक चांगला संदेश जाईल.
बदलत्या काळात क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांनाही महत्व मिळत आहे. यात बॉडी बिल्डिंगमध्येही करिअर करण्याइतपत महत्व आले आहे. पूर्वी केवळ क्रिकेटर्सचे रेकॉर्ड मिळत असे. पण आज सोशल मीडियामुळे बॉडी बिल्डर्सचेही रेकॉर्ड सहज उपलब्ध होते. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. एक चांगला बॉडी बिल्डर तर होता येतंच, पण ते जरी जमले नाही तर एक चांगला फिटनेस ट्रेनर होता येते. सरकारी किंवा खासगी नोकऱ्यांसोबतच बिझनेसच्या संधीही खूप आहेत.
पुणे-मुंबईसारख्या महानगरांत एक चांगला फिटनेस ट्रेनर दरमहा किमान एक-दोन लाख तरी सहज कमवू शकतो अन तो जर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर झाला तर दरमहा किमान 20-25 लाख सहज कमवू शकतो. त्यामुळे तरुणांनी करिअरसाठी बॉडी बिल्डिंग क्षेत्राला प्राधान्य द्यायला हरकत नाही. मात्र त्यात जीव ओतून निष्ठेने काम केले पाहिजे असे सुहास कामकर यांनी सांगितले. बाईट
यावेळी बेळगावचे प्रसिद्ध बॉडी बिल्डर मि. आशिया सुनील आपटेकर, प्रीतम चौगुले आदी उपस्थित होते.


Recent Comments