Belagavi

पिरनवाडीत समुदाय भवनाचे भूमिपूजन

Share

बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथे समुदाय भवनाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पिरनवाडीतील श्री दुर्गादेवी मंदिर कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष श्री देव जोशी यांच्या हस्ते श्री दुर्गा देवी मंदिर शेजारील जागेत समुदाय भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे शंकर विटेकरी, चंदन जोशी, राजू जोशी, अक्षय विटेकरी, लक्ष्मण बागले, कृष्णा बागले आदी समाजातील मान्यवर उपस्थितीत होते.

Tags: