Belagavi

बेळगावमध्ये “उगादी कविसंमेलन ” संपन्न

Share

कविमनाच्या माणसांनी राजकारणात येऊ नये , आपली साहित्यिक काव्य प्रतिभा ही सहज आणि सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी असावी असे , डॉ. पी. एस. माळी म्हणाले . .

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित केलेल्या कवी एस. डी. इंचल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ , “उगादी कविसंमेलन” कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्ष डॉ. पी. एस. माळी होते . यावेळी त्यांनी ‘बेळगाव जिल्ह्याचा काव्य वारसा या विषयावर विशेष व्याख्यान दिले .

ऋषिकेश बहादूर देसाई यांच्या हस्ते या काव्यसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले . डॉ. महेश गुरनगौडा यांनी या कार्यक्रमाचा आशय विशद केला .

सेवानिवृत्त मागासवर्गीय कल्याण अधिकारी बसवराज गारगे यांनी प्रास्ताविक केले . या काव्य संमेलनात सिद्धराम तलवार, शिवानंद मठपती, धरणीेंद्र दड्डी, देमन्ना सोगलद ,
बसवराज होनगौडा, रेणुका करारी , गंगव्वा मठपती वीणा बडिगेर, आनंदी नायक आदी कवी सहभागी झाले होते . त्यांनी वेगवेगळ्या विषयावरील आपापल्या कविता सादर केल्या .

नदीमा सनदी यांनी या काव्यसंमेलनचे सूत्रसंचालन केले . शंकर बागेवाडी, मुरुगेश शिवपूजे, डॉ . सरजू काटकर , डॉ . बसवराज जगजंपी , निळगंगा चरंतीमठ , प्रा . एम व्ही पाटील , डॉ . गुरुदेव हुलेप्पनवरमठ आणि अन्य मान्यवर कवी आणि साहित्यिक यावेळी उपस्थित होते .

Tags: