चिक्कोडी पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत घरात ठेवलेली सुमारे तीन लाखांची दारू जप्त करण्यात आली.

चिक्कोडी तालुक्यातील तोरणहळ्ळी येथील रावसाहेब पाटील यांच्या घरात दारूसाठा असल्याची माहिती चिक्कोडी पोलिस व एफएसटी पथकाला मिळाली. त्यानुसार घराचे कुलूप तोडून घरावर छापा टाकून घरातून 3 लाख किमतीचे 365 लिटर दारूचे 42 बॉक्स जप्त करण्यात आले.
या कारवाईत चिक्कोडी पीएसआय सचिन दसरेड्डी, अतिरिक्त पीएसआय गिरीश, एएसआय वाल्की, मंजू सतीगेरी, एसपी गलगली, आर आर करिगार आणि एफएसटी टीमचे कर्मचारी सहभागी होते. याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


Recent Comments