Bellary

आठवडाभरात भाजपच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर : मंत्री बी. श्रीरामुलू

Share

आठवडाभरात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे अशी माहिती मंत्री बी. श्रीरामुलू यांनी बेळ्ळारी येथे दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री बी. श्रीरामुलू म्हणाले की, काल आम्ही राज्यातील सर्व मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यावी याविषयी मते गोळा केली आहेत. त्यावर कोअर कमिटीमध्ये चर्चा करून केंद्र नेत्यांकडे ती पाठवू. भाजप सरकारने सर्व समाजाला आरक्षण देऊन सामाजिक न्याय दिला आहे. राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डीकेशी आणि सिद्धरामय्या यांच्यावर टीका करताना मंत्री बी. श्रीरामुलू म्हणाले की, सत्तेत येण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरणार आहे. खुर्चीच्या हव्यासापोटी ते राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला.

आमदार एन. वाय. गोपाळकृष्ण यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे, त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, गोपालकृष्ण हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचा पक्ष सोडून गेल्याचे आम्हाला दुःख आहे. कुडलिगी मतदारसंघात आमचा पक्ष मजबूत असून या वेळी आम्ही पुन्हा विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळ्ळारी ग्रामीण मतदारसंघातून आपण चार वेळा विजयी झालो आहोत. गेली ३० वर्षे हीच माझी जन्मभूमी, कर्मभूमी आणि धर्मभूमी आहे. या क्षेत्रातील लोक माझा हात धरतील. बेळ्ळारी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी माझी भूमिका पक्षातील ज्येष्ठांना कळवली आहे असे ते म्हणाले. काँग्रेस नेत्यांना धमक्या देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचा मुद्द्यावर, एकाधिकारशाही व्यवस्थेविरुद्ध लढा देणारे आम्ही आहोत. त्या पार्श्‍वभूमीतून आलेलो नाही. मी अशा विधानांना प्रतिसाद देत नाही असे श्रीरामुलू यांनी स्पष्ट केले.

एकंदर भाजपची बहुप्रतीक्षित उमेदवारी यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होईल अशी अपेक्षा श्रीरामुलू यांनी व्यक्त केली आहे.

Tags: