सेवाजननी फौंडेशन आणि व्हिक्टॉन कंपनीच्या वतीने बेळगावातील कन्नड साहित्य भवनात आज दिव्यांगांना मोफत जयपूर फूट बसविण्याचे शिबीर घेण्यात आले. यावेळी 25 दिव्यांगांना जयपूर फूट प्रदान करण्यात आले.
पाय नसलेल्या दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याच्या सद्हेतूने सेवाजननी फौंडेशन आणि व्हिक्टॉन कंपनीच्या वतीने बेळगावातील कन्नड साहित्य भवनात आज दिव्यांगांना मोफत जयपूर फूट बसविण्याचे शिबीर घेण्यात आले. यावेळी 25 दिव्यांगांना जयपूर फूट प्रदान करण्यात आले.
त्याशिवाय त्यांना कृत्रिम पाय कसे वापरावेत, ते घालून कसे चालावे याचे प्रशिक्षणही देण्यात आले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना सेवाजननी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जगदीश अमात्यगौडर यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी जयपूर फूट बसविण्यासाठी आम्ही बेळगाव जिल्ह्यातील दिव्यांगांना अर्ज जर्ण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन आलेल्या 25 दिव्यांगांना जयपूर फूटसाठी मोजमाप घेण्यात आले होते. त्यानंतर कृत्रिम पाय बनवून ते बसविण्यासाठी आज बोलावण्यात आले होते.
त्यानुसार येथे आलेल्या 25 दिव्यांगांना जयपूर फूट प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना कृत्रिम पायांच्या आधारे कसे चालायचे याचे प्रशिक्षणही देण्यात आले. यासाठी व्हिक्टॉन कंपनी, कंपनीचे अधिकारी सिद्धार्थ बंगारी आदींचे अर्थसाह्य लाभले आहे. आमच्या फौंडेशनला व्हिक्टॉन कंपनी, साईराम ट्रस्ट, रामदुर्ग, किरण फौंडेशन आदींचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बेळगावसह निपाणी, बागलकोट, रोन, गदग आदी ठिकाणहून आलेल्या 25 दिव्यांगांना जयपूर फूट बसविण्यात आले.


Recent Comments