बेळगावच्या हनुमान नगर, दुसरा क्रॉस येथील रहिवासी भाऊराव भरमा पाटील(वय ५९ ) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले .

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , एक मुलगा असा परिवार आहे . ते विजय एजन्सीचे मालक तसेच ज्योतीनगर कंग्राळी खुर्द येथील ज्योतिर्लिंग युवक मंडळाचे अध्यक्ष तसेच ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा मंडळाचे अध्यक्ष म्हणून गेली ३० वर्षे कामकाज पाहत होते .
उद्योगासोबतच, समाजसेवेच्या क्षेत्रात ते अग्रेसर होते . त्यांच्या निधनावर सर्व थरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे . बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाचे संचालक , बिल्डर अँड डेव्हलपर विजय पाटील यांचे ते जेष्ठ बंधू होते .


Recent Comments