हुक्केरीमध्ये वडिलांच्या निधनानंतरही मुलीने एसएसएलसीची परिक्षा दिली.

हुक्केरी तालुक्यातील केस्ती गव्हर्नमेंट हायस्कूलची दहावीची विद्यार्थिनी कुमारी मिद्दत अब्दुलराजाक सनदी, हिचे वडील अब्दुलराजाक सनदी यांचे शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांची मुलगी मिद्दत हिने आज तिची एसएसएलसी परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला होता. ही बाब समजताच हुक्केरी बीईओ मोहन दंडिन व शिक्षक या विद्यार्थिनीच्या घरी गेले व तीला आज परीक्षेला बसण्यास सांगितले. तीला परीक्षेसाठी प्रोत्साहित केले.
श्रीमती एस. पी. हलकी, पी. डी. पाटील, शिवानंद गुंडाळी, केंद्राचे मुख्य अधीक्षक पी. पी. खोत आदी बीसीआय अधिकारी उपस्थित होते.
आजच्या परीक्षेत एकूण 43 विद्यार्थी गैरहजर होते.
सहसंचालक गजानन मन्निकेरी यांनी तालुक्याला भेट देऊन परिक्षेचे काम पाहून आनंद व्यक्त केला.


Recent Comments