Belagavi

वडगावमधील तरुणांचा भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

Share

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडीत वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचीही लाट आली आहे. अशातच वडगावमधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांच्या नेतृत्वाखाली सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी वडगाव येथील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बेळगाव दक्षिण मतदार संघातून बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.

प्रभू यत्नट्टी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. नुकताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला हा मनोदय जाहीर केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने बेळगाव दक्षिण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: