एका प्रेमीयुगुलांने घरच्यांनी प्रेमाला संमती न दिल्याने गळफास घेऊन जीवन संपविले. धारवाड तालुक्यातील हेब्बळी गावात ही दुर्दैवी घटना घडली.
मैलारी कालाळद, वय 22 आणि त्याच्या 16 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीने आत्महत्या केली. काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी याला आक्षेप घेतला. हे प्रेमीयुगुलही गेल्या तीन-चार दिवसांपासून बेपत्ता होते. मुलीच्या कुटुंबीयांनीही आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.
मात्र, प्रेमीयुगुलाने तरुणाच्या बांधकामाधीन घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


Recent Comments