Belagavi

रताळ्याचे दर घसरल्याने शेतकरी नाराज

Share

बेळगाव नजीकच्या खेड्यांमध्ये , कडोली , अलतगे आदी गावातील शिवारांमध्ये सध्या उन्हाळी बटाटे आणि रताळी काढणी सुरु आहे . मात्र रताळ्याना दर कमी मिळत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करी आहेत .

साधारणपणे सुगीनंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात रताळी लागवड केली जाते . पंजाब आणि दिल्ली या ठिकाणी रताळ्यांना मोठी मागणी असते . अलतगे शिवारात , रताळी काढण्याची लगबग सुरु आहे . ही रताळी पोत्यांमध्ये भरली जात आहेत .

यंदा पीक देखील चांगले आहे मात्र दर घसरला आहे . यासंबंधी अलतगे येथील प्रगतिशी शेतकऱ्यांनी सांगितले कि , पंजाब आणि दिल्ली येथे रताळ्यांना मागणी आहे . या आधी २७०० ते २८०० असा दर होता तो आता एकदम कमी होऊन १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे . घाऊक दुकानदार आणि दलाल यांचा फायदा होत आहे मात्र शेतकऱ्यांना यात नफा मिळत नाही . शिवाय दलाल शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत . जरी या पिकाला उत्पादन खर्च फार येत नसला तरी मेहनत खूप आहे . मिरची पिकाची देखील तीच स्थिती आहे . मिरचीला देखील दर फार कमी मिळत आहे .

एकंदर , उन्हाळी रताळी काढणी वेगात सुरु आहे मात्र मनासारखा दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत . सरकारने या पिकासाठी दर निश्चित करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत .

Tags: