Belagavi

सुळगा गावात विठ्ठल बिरदेव जत्रा

Share

जागृत ग्राम देवता व हालुमत(धनगर) समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव देवालयाचा सालाबादप्रमाणे होणारा सुळगा गावात पार पडला .

सालाबादप्रमाणे सुळगा गावचा होणाऱ्या श्री विठ्ठल बिरदेव जत्रामहोत्सवासाठी बेळगाव तालुक्यातील बावीस खेड्यातील धनगर बांधव आपल्या ढोलवाद्यसह जमले होते . धनगरी ढोलांच्या तालावर, भंडाऱ्याची उधळण करीत गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली .यामध्ये महिला देखील सहभागी झाल्या होत्या .

प्रथम सहवाद्य गावातील सुवासिनींनी आंबील कलश आणले .जत्रोत्सवाच्या तोंडावर विधान सभेची निवडणुक आली असल्याने विविध नेतेमंडिळींची भेट देऊन देवाचे दर्शन घेत आहेत . युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही जत्रामहोत्सवामध्ये सहभागी होऊन देवाचे दर्शन घेतले . यात्रा कमिटीच्यावतीने त्यांचा हार,शाल व फेटा बांधून स्वागत करण्यात आले. युवा नेता श्री मृणाल हेब्बाळकर हे कार्यक्रमाला उद्देशून मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर समाजाचे जेष्ठ लक्ष्मण उचगांवकर,माजी के.एम.एफ.संचालक व ग्रा.पं.सदस्य भागाण्णा नरोटी,मल्लाप्पा सुळगेकर,गंगाराम नरोटे,परशराम उचगांकर,भरमा उचगांवकर,चन्नाप्पा अनगोळकर,देवाप्पा सावगांकर,एल.वाय.पाटील,अजित कदम व अमित कांबळेसह यात्रा कमिटीचे पदाधिकारी,भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंतर भाजपचे इच्छुक उमेदवार नागेश मन्नोळकर यांनीही भेट देऊन दर्शन घेतले . नंतर मुतगा व पिरणवाडी गावच्या गायन संघातर्फे धनगरी गाण्यांची रात्रजागरण झाली.
नंतर बुधवारी सकाळी अभिषेकासह विधिवत पुजा झाल्यानंतर अकरानंतर पालखी उत्सवाला प्रारंभ होऊन गावातील प्रत्येक मंदिर,गल्ली व गावभर मिरवणूक काढून परत पालखी मंदिरपाशी नेण्यात आली . जत्रा महोत्सवाचे मुख्य पारंपारिक धार्मिक विधी झाल्यानंतर महाप्रसादाने जत्रेची सांगता करण्यात आली .

जत्रेदरम्यान पालखी उत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले .

Tags: