विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध कारवायांवर आळा घालण्यासाठी अबकारी आणि पोलिस खात्याने कडक लक्ष ठेवले आहे. रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावात अबकारी खात्याच्या पथकाने अवैध दारू जप्त केली.

बावनसौंदत्ती गावात अबकारी खात्याच्या पथकाने राजू कृष्णप्पा मरिनायक रा. बावनसौंदत्ती याला बेड्या ठोकून 8 लिटर 640मिली अवैध दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरोधात रायबाग पोलीस स्थानकात अबकारी कायद्याच्या कलम 32,34 अन्वये गुन्हा क्र. 90/ 2023 नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments