Dharwad

सदाशिवनगर येथे न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोचे थाटात उदघाटन

Share

देशाच्या विविध भागात उत्तम उत्तम अशा वस्तूंचे प्रदर्शन यशस्वी करून न्यू इंडीयन क्राफ्टस एक्स्पो आता कुंदानगरी बेळगाव सदाशिवनगर परिसरांत लक्ष्मी कॉम्प्लेक्स शेजारी येथे मंगळवार दि 28 मार्च पासून येथे सुरु झाले आहे.

सदाशिवनगर येथे न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोचे उदघाटन बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेविका सविता कांबळे, सविता हेब्बार, रक्षा उपाध्ये आदी उपस्थित होते. आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी स्वागत व परिचय करून दिला. आयोजक आशुतोष शर्मा यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

या प्रदर्शनात देशभरातील 100 हून अधिक स्टाॅलधारकांनी भाग घेतला आहे. हे प्रदर्शन ताज थ्रेड, हॅंडलूम गुडस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यश कम्युनिकेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. येथे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीसा, काश्मीर, सिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागीरांनी स्वत: हातानी बनविलेल्या वस्तू या हस्तकला प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध केल्या आहेत.

हँडमेड गिफ्ट्स, हॅंडमेड प्रोडक्टस, ज्वैलरी, टेराकोटा होम डेकोर, खुर्जा क्राॅकरी, डिजाईनर क्लोथ, वाराणसी साड़ी, कोलकाता, आसामी साड़ी व क्लोथ, भागलपुर साडी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, कारपेट, पायपोस, हर्बल प्रोडक्ट्स, होम फर्निशिंग बुक्स, शूज रॅक, काश्मीरी शाल व सूट, खादी कपड़ा, खादी हॅंण्डलुम, गुजराती पर्स, किचन वेयर, सहारनपुर फर्निचर, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी शर्ट, मुलांची खेळणी, जयपुरी रजई, लेदर आयटम, बेडशीट, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडीज कुर्ती, गाऊन, क्राॅकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, साॅफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बॅंगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडीज गाऊन, मोबाईल कव्हर, शिवाय मैसूर हेअर ऑइल, तिरुपुर टी-शर्ट, पायजमा, ट्रॅक सूट, खेकडा बेडशीट्सच्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत.

संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी अशा प्रकारचे हे प्रदर्शन 30 दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक आशुतोष शर्मा व प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली.

Tags: