निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हुक्केरी तालुक्यातील आडवीसिद्धेश्वर व शंकरलिंग पाटबंधारे प्रकल्पासाठी भूमिपूजन करण्यात आले.

नेर्ली गावातील बसवेश्वर मंदिर परिसरात झालेल्या समारंभात माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्तीनी भूमिपूजन केले . नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन कत्ती म्हणाले की, दिवंगत उमेश कत्ती यांच्या विशेष प्रयत्नांमुळे , संकेश्वर आणि हुक्केरी शहराजवळील जबापुर, कोचरी, मसरगुप्पी, नेर्ली, एलिमुन्नोल्ली, अर्जुनवाड या गावांना सिंचनाची सुविधा मिळणार आहे, या भागातील शेतकऱ्यांचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि भविष्यात बोअरवेलचे पुनरुज्जीवन केले जाईल.

नंतर नेर्ली, एलिमुन्नोल्ली, ग्रामपंचायत सदस्यांनी पवन कत्ती यांचा सत्कार केला यावेळी अशोक पट्टणशेट्टी, मीरासाब मुलतानी, तमन्ना पाटील, ईश्वर खोत , सागर जाधव, भीमगौडा पाटील, कलगौडा पाटील, रवी पाटील, नेर्ली, हंजयनत्ती, मसरगुप्पी, कोचरी, हुक्केरी, भागातील शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments