Dharwad

काँग्रेस कार्यकर्त्यांची धारवाड येथे निदर्शने

Share

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी धारवाड येथे निदर्शने केली. पॅन आणि आधार कार्ड लिंकिंगसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सगळ्या चोरांची नावे मोदीच का असतात? असे वक्तव्य केल्या प्रकरणातील खटल्यात दोषी आढळल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली आहे. त्याच्या निषेधार्थ धारवाड काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

धारवाड ग्रामीण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून पंतप्रधान मोदींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले. त्याचप्रमाणे पॅन आणि आधार कार्ड लिंकिंगसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी करण्यात आली.

Tags: