राज्यातील खासगी शिक्षण संस्थाच्या वतीने प्रवेशासाठी घेण्यात येणारी कॉमेड के ही परीक्षा दि. २८ मे रोजी होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहिती कॉमेड केअर्स संस्थेचे सचिव एस. कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर ही परीक्षा घेण्यात येते.
संस्थेमार्फत त्याचप्रमाणे युनिगेज याच ही येते. परीक्षा देखील घेण्यात याबाबत विद्यार्थ्यांनी अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.कॉमेड के या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. मात्र, त्यासाठी देशभरातील ४०० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यावर्षी सुमारे १० हजार विद्यार्थी ही परीक्षा देतील, असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी एरा संस्थेचे सीईओ पी. मुरलीधर उपस्थित होते.
Recent Comments