निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याबरोबर बेळगाव महानगर पालिकेने जागृत होऊन शहरातील राजकीय नेत्यांचे बॅनर्स हटवले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी मे १० रोजी मतदान आणि १३ रोजी मतमोजणी घेणार असल्याचे जाहीर केले. यासोबतच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता देखील आजपासूनच जारी केल्याने बेळगावचे प्रशासकीय आणि मनपाचे अधिकारी शहर व जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर लावलेले सरकारी योजनांचे फलक, राजकीय पक्षांचे फलक, हटविण्यास प्रारंभ केला.
बेळगाव शहरातील चन्नम्मा चौक, कोल्हापूर क्रॉस, रामदेव हॉटेल रोड, अशोक चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, बसवेश्वर सर्कल आदी ठिकाणचे आणि प्रमुख मार्गावरील बॅनर्स व पेंट केलेले राजकीय पक्ष आणि नेत्यांचे फलक काढून टाकण्यात आले.
निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने अधिकारी निवडणूक नियमांची कडक अमलबजावणी करत आहेत.


Recent Comments