Belagavi

बंजारा समाजाची एस सी अंतर्गत आरक्षणाबाबत पी राजीव यांनी दिले समाधानकारक उत्तर

Share

एससी समाजाच्या अंतर्गत आरक्षणाला बंजारा समाजाचा विरोध असल्याच्या प्रश्नाबाबत समाजातील लोकांनी बेळगाव येथील बंजारा विकास महामंडळाचे अध्यक्ष पी. राजीव याना विचारणा केली .

बेळगावातील संगमेश्वर नगर येथील बंजारा समाज भवनाच्या भूमिपूजनासाठी पी.राजीव आले होते. लोकांनी पी. राजीव यांना आरक्षण कमी करण्याच्या मुद्द्यावर विचारले.

पी.राजीव यांनी सांगितले कि ,प्रथम अनुसूचित जाती म्हणजे काय ते जाणून घ्या. बंजारा, भोवी, कोरच, कोरम या समाजातील लोकांना संविधानाची माहिती देणारा ग्रुप बनवला गेला आहे .

डाव्या, उजव्या आणि भटक्या अशा 97 जाती एकत्र आहेत. केवळ चार जातींना साडेचार टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सदाशिव यांनी आयोगात तीन टक्के शिफारस केली होती. आमची मागणी दोन टक्के होती.

बंजारा समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणातून बाहेर टाकण्याचे षडयंत्र होते, ही आमची मागणी होती. यावर राज्य सरकारने लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याचे उत्तर देण्याचे काम मागील सरकारने केले नाही. बोम्मई यांनी १६ फेब्रुवारीला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पत्र लिहिले होते. एससी यादीतून बंजारा, कोरच, कोरम, बोवी कायमस्वरूपी काढण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. बोम्मयी यांनी या जातींना आरक्षण दिले , हे काम याआधी कोणी केले नव्हते.

फक्त एखाद्यासाठी संभ्रम निर्माण करण्यासाठीते त्यांच्या घरावर दगडफेक करण्याचे काम करतात. कोणीही गोंधळून जाऊ नये. बोम्मईनी आमची मागणी पूर्ण केली आहे. आमदार पी.राजीव यांनी अशी आरक्षणाची बाजू मांडली.

Tags: