Crime

येडियुरप्पा यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक

Share

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुसूचित जाती (एससी) अंतर्गत आरक्षणाविरोधात सोमवारी शिवमोग्गा जिल्ह्यातील बंजारा आणि भोवी समुदायाच्या सदस्यांनी काढलेल्या निषेध मोर्चा दरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

आंदोलकांनी दगडफेक केल्याने, पोलीस अधिकारी जखमी झाल्यानंतर शिकारीपुरा शहरात सीआरपीसी कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेस नेत्यांचा यात हात असल्याचा आरोप करून घटनेचा निषेध केला आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकारने अनुसूचित जाती (एससी) अंतर्गत आरक्षण जाहीर केल्याने अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांची गरज नव्हती,

 

येडियुरप्पा यांनीच तर बंजारा समाजासाठी सर्वप्रथम तांडा अभिवृद्धी निगम स्थापन केले होते असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा हल्ला राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

Tags: