बेळगावातील जुना पीबी रोड-येडियुरप्पा मार्गावर कारमधून नेण्यात येणारी 163,933 रुपये किंमतीची अवैध दारू आणि कार एपीएमसी व शहापूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केली.

विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी चोरीछुपे नेण्यात येणाऱ्या अवैध दारू आणि आमिशांवर कडक नजर ठेवली आहे. मिळालेल्या पक्क्या खबरीच्या आधारे एपीएमसी आणि शहापूर पोलिसांनी जुन्या पीबी रोडवरून जाणाऱ्या मारुती अल्टो कार थांबवून तपासणी केली असता, त्यात
123,933 रुपये किंमतीची विविध ब्रॅंड्सची दारू आढळून आली. ही दारू आणि तिच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 40 हजार रुपये किंमतीची मारुती अल्टो कार क्र. केए 22 पी 3038 जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत 163,933 रुपये आहे. या प्रकरणी आरोपी 53 वर्षीय अनिलकुमार हज्जी,
रा. मूळ हरिजनवाडी, एकसंबा, ता. चिक्कोडी , सध्या शिवाजीनगर, बेळगाव याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपिनी शहापूर आणि एपीएमसी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments