बेळगाव दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसकडून सात जणांनी तिकीट मागितले असून, त्यापैकी मी तिकीटाचा इच्छुक आहे. पक्ष मला ओळखून तिकीट देईल, असा विश्वास असल्याचे वकील कुमार सरवदे यांनी सांगितले.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, “माझा जन्म एका गरीब विणकर कुटुंबात झाला आणि मी कायद्याची पदवी कष्टाने मिळवून वकील म्हणून काम करत आहे.
मी 35 वर्षांपासून लोकसेवा करत आहे. मी केपीसीसी राज्य सचिव म्हणून काम केले आहे. यावेळी मी विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मागत आहे. दक्षिणेकडील क्षेत्रात चांगली विकासकामे झाली पाहिजेत. सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब विणकरांचे हाल दूर करण्यासाठी मी राजकारणात पाऊल ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर बेळगाव दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटासाठी चुरस सुरु असून , ऍड . कुमार सरवदे हे देखीलया मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत .


Recent Comments