बेळगाव शहरात विकासाची वाटचाल सुरु ठेवणाऱ्या आमदार अनिल बेनके यांनी आज एका दिवसात 6 कोटी खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ केला.
भूमिपूजन करून कामाला चालना दिल्यानंतर बोलताना आ. अनिल बेनके यांनी सांगितले की, बेळगाव उत्तर मतदारसंघातील विशेषत: कणबर्गी येथील दोन तलावांच्या विकासासाठी 1.60 लाख रुपये खर्च करून विकास कामांना सुरुवात करण्यात आली.

रामतीर्थनगरमध्ये सुशोभित दिवे बसविण्यासाठी 1.40 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय बसवन कुडची येथे २ कोटी रुपये खर्च करून तलाव व रस्त्याच्या विकासाला सुरुवात करण्यात आली आहे. आज एकूण 6 कोटी रुपये खर्चून विविध कामांचा शुभारंभ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक हणमंत कोंगाली आदी उपस्थित होते.


Recent Comments