Belagavi

लैंगिक अल्पसंख्यांक समुदायासाठी जागृती कार्यक्रम

Share

लैंगिक अल्पसंख्यांक समुदायाला सरकारी योजनांचा लाभ मिळवून , त्यांना आर्थिक , सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया सक्षम करण्यासह , एड्सबद्दल जागृती करण्याचे कार्य स्नेहज्योती महिला संस्था करीत असल्याचे संस्थेचे चामराजनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर एच पाटील यांनी सांगितले .

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे ,स्नेहज्योती महिला संस्था , बेळगावच्या वतीने लैंगिक अल्पसंख्यांक समुदायासाठी आयोजित केलेल्या जागृती कार्यक्रमात ते बोलत होते . ते म्हणाले कि , जिल्ह्यात काही वर्षांपासून , लैंगिक अल्पसंख्यांकांसाठी एड्स जागृती कार्यक्रम आयोजित करून , त्यांच्यामध्ये जागृती केली जात आहे . त्याचप्रमाणे , या समुदायासाठी असलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करून घेऊन , त्यांना आर्थिक ,सामाजिक , शैक्षणिक दृष्ट्या सबल कारण्याचे काम आम्ही करीत आहोत . जिल्हास्तरावर जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी अनिल कोरबू तसेच स्नेहज्योती महिला संस्थेच्या अध्यक्ष राजम्मा हे कार्य करीत आहेत .


प्रारंभी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

या कार्यक्रमालाएफडीएआयचे व्यवस्थापक गोविंद कुलकर्णी , जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा व्यवस्थापक जहागीरदार , बीम्सचे वैद्यकीय अधिकारी भावडेकर , डॉ . हलसन्नवर , हुमनीटी फाउंडेशनच्या सेक्रेटरी नम्रता आणि इतर यावेळी उपस्थित होत्या .

Tags: