Belagavi

पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या बसव आर्ट गॅलरी/ अनुभव मंडपाचा नाही विकास

Share

संगोळी रायण्णा महाविद्यालयाच्या मागील बाजूस पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या बसव आर्ट गॅलरी/ अनुभव मंडपाचा विकास न करता ,विकासाच्या नावाखाली तिथे व्यावसायिक दुकाने आणि इमारती बांधल्या जात आहेत . याबद्दल लिंगायत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
VOICE OVER : पाच वर्षांपूर्वी या बसवं आर्ट गॅलरी /अनुभव मंडप बांधण्यात आला . मात्र त्याचे उदघाटनही करण्यात आलेले नाही . गेल्या पाच वर्षात इथल्या लोकप्रतिनिधींनी या वास्तूच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही . या अनुभव मंडपाचा दरवाजा , काचा फोडण्यात आल्या आहेत . शिवाय ही बसव आर्ट गॅलरीच्या परिसराचा विकास देखील करण्यात आलेला नाही . आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे विकासाच्या नावाखाली, व्यावसायिक दुकाने आणि इमारती बांधण्यात येत आहेत . याला लिंगायत संघटना तीव्र विरोध दर्शवत आहेत


याविषयी ऍड . आर पी पाटील म्हणाले कि , संगोळी रायण्णा महाविद्यालयाच्या मागील बाजूस पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या बसव आर्ट गॅलरीच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेवर व्यावसायिक दुकाने किंवा इतर इमारती उभारण्याचे निष्फळ प्रयत्न होत आहेत. पाच वर्षात भाजपच्या आमदारांनी याकडे लक्ष दिलेले नाही . आता निवडणूक आल्याने लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी , सर्व हालचाल सुरु झाली आहे . भाजप सरकार खोटे बोलून , जनतेची फसवणूक करीत आहे . जनतेने याचा निषेध व्यक्त केला पाहिजे . फक्त जनतेला दाखवण्यासाठी हे काम करीत आहेत . बसव आर्ट गॅलरीच्या शेजारी , व्यवसायिक दुकाने निर्माण करण्यात येत आहेत . ते काम बंद करावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला . इथल्या रिकाम्या जागेत एक सुंदर उद्यान बनवावे, असे आवाहन ऍड आर पी पाटील यांनी दिला आहे .

या अनुभव मनपाच्या विकासासाठी आ आमदार प्रयत्न करीत आहेत . यासाठी नुकतीच बैठक पार पडली . यासाठी कमिटी देखील नेमली आहे . दोनदा कमिटीची बैठक देखील झाली . पण अजून काम सुरु झाले नाही . या अनुभव मंडपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे , यासाठी आमदारांनी लक्ष घालावे . असे आवाहन देखील लिंगायत संघटनेचे पदाधिकारी शशिभूषण पाटील यांनी केले .

जगातील पहिल्या संसद अनुभव मंडपाचे संस्थापक जगज्योती बसवेश्वर यांच्या नावाने सुंदर उद्यान उभारावे आणि बसवण्णांचे नाव देण्यात यावे. त्या रिकाम्या जागेत कोणत्याही प्रकारची इमारत बांधण्यास परवानगी देऊ नये. त्यामुळे बसव आर्ट गॅलरीचे महत्त्व तर कमी होईलच शिवाय तिचे सौंदर्यही बिघडणार आहे. त्यामुळे जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने आणि सर्व बसव समर्थक संघटनांच्या वतीने निवेदन करण्यात आले कि , त्या ठिकाणी इतर कोणत्याही प्रकारच्या इमारती न बांधता उद्यान बांधण्यात यावे. याउलट रिकाम्या जागेवर उद्यानाऐवजी इमारती उभारण्याचा प्रयत्न झाल्यास जागतिक लिंगायत महासभा आणि तमाम बसव समर्थक संघटनांना तीव्र विरोध आणि संघर्ष करावा लागेल. असा इशारा लिंगायत महासभेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज रोटी यांनी दिला आहे .

Tags: