Belagavi

बेळगावात ‘रामसेना कर्नाटक’ या नव्या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना

Share

हिंदू धर्माच्या रक्षणाचा आणि लव्ह जिहाद, गोहत्या रोखण्याच्या हेतूने बेळगावात रामसेना कर्नाटक या नव्या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना करण्यात आली. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

होय, हिंदू धर्माचे रक्षण आणि लव्ह जिहाद, गोहत्यासारख्या हिंदू धर्माच्या विरोधातील कृत्ये रोखण्याच्या हेतूने रोखण्याच्या हेतूने बेळगावात नव्या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. “रामसेना कर्नाटक” नामक या संघटनेचे उदघाटन प्राणांचे बलिदान देऊनही हिंदुत्व व सोडणारे धर्मवीर संभाजी महाराज यांना साक्षी ठेवून करण्यात आले. तत्पूर्वी किल्ला येथील श्री दुर्गामाता मंदिरात दुर्गादेवीची पूजा करून किल्ला ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर चौकातील शंभू तीर्थावर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजन करून अभिवादन करण्यात आले. निपाणीजवळील शेंडूर येथील अरुणानंदतीर्थ स्वामीजी यांनी धार्मिक विधी व पौराहित्य केले.

यावेळी बोलताना रामसेना कर्नाटकचे राज्य उपाध्यक्ष बाळू कुरबर यांनी सांगितले की, देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असूनदेखील हिंदू धर्माचे रक्षण करणे कठीण होत आहे. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी संस्थापन प्रसाद अत्तावर यांच्या नेतृत्वाखाली रामसेना कर्नाटक या नव्या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. अत्तावर यांनी राज्य उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शाखा सुरु करून संघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. फसवून केले जाणारे धर्मांतर रोखणे, लव्ह जिहाद, गोहत्या रोखणे आणि हिंदू धर्माचे रक्षण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शेंडूर येथील अरुणानंदतीर्थ स्वामीजी यांनी सांगितले की, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि भारतमाता, गोमाता, हितमाता, गंगामाता आणि वेदमाता या पंचमातांच्या रक्षणासाठी रामसेना कर्नाटक या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. हिंदुराष्ट्राचे धर्मवीर संभाजी महाराज यांनी प्राण सोडले पण हिंदू धर्म सोडला नाही, त्यांचा आदर्श, प्रेरणा घेऊन ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.

यावेळी धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी रामसेना कर्नाटक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: