Hukkeri

यमकनमर्डी येथे भाजपचा विजय संकल्प मेळाव्यात काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

Share

यमकनमर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात , काँग्रेस नेत्यांसार जोरदार हल्लाबोल करण्यात आला .

विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि म्हैसूर-कोडगूचे खासदार प्रताप सिन्हा यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील हेब्बाळ गावात आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात हल्लाबोल केला .

व्यासपीठावर ,इराण्णा कडाडी, चिक्कोडी जिल्हा भाजपचे अध्यक्ष डॉ राजेश नेर्ली चिक्कोडी जिल्हा एसटी मोर्चाचे अध्यक्ष बसवराज हुंद्री, भाजप कर्नाटक राज्य कार्यदर्शी उज्वला बडवाण्णाचे , हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी व निखिल कत्ती , उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल यमकनमर्डी व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: