निवडणूक संहितेचे उल्लंघन करून विनापरवानगी आणि योग्य कागदपत्रांअभावी वाहतूक करण्यात येत असलेल्या 2.5 किलो वजनाच्या चांदीच्या चेन्स आणि अवैध दारू निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.
कागवाड तालुक्यातील कागवाड जवळील गणेशवाडी चेक पोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य कागदपत्रे नसलेल्या 2.5 किलो वजनाच्या चांदीच्या चेन्स जप्त केल्या. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील उपनिरीक्षकांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे कणकुंबी चेक पोस्टवर भारतीय बनावटीची 52.875 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. त्याशिवाय 34 लिटर बिअर जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूची किंमत 78,284 रुपये आहे. तर त्याची वाहतूक करणाऱ्या जप्त केलेल्या वाहनांची किंमत 10,00,000 रुपये आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 10,78,284 रुपये आहे. या प्रकरणी आसामचे रहिवासी वाहन चालक बिपुलकुमार कोरुमकर आणि मन्ना केचुआ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments