Belagavi

आमदार रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते शिंदोळीत संगोळी रायण्णा पुतळ्याचे उदघाटन

Share

माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते बेळगाव तालुक्यातील शिंदोळी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या , श्री क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

ते म्हणाले की, श्री क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले आणि इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी गनिमी कावा केला. भारत.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले . सध्याचे काही राजकारणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी जातीजातींमध्ये विषाची बीजे पेरण्याचे आणि लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत आपला देश हा एक देश आहे. सर्व जातीधर्माचा मिळून बनलेला आहे .

यावेळी खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, नागेशमन्नोळकर , सतीश शहापूरकर, रफिक गोकाक, महांतेश पाटील, महांतेश अलबादी, बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे सदस्य व रमेश जारकीहोळी यांचे प्रशंसक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: