विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 9 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाने केली आहे. या यादीत बेळगाव जिल्ह्यात पाच विद्यमान आमदार, तीन माजी आमदार आणि एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर, यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी, चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलागी यांनी तिकीट जाहीर केले आहे.
पहिल्या यादीत हुक्केरी मतदारसंघात माजी आमदार ए. बी. पाटील, कागवाडचे माजी आमदार राजू कागे, रामदुर्गचे माजी आमदार अशोक पट्टण यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. कुडची मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. येथे महेंद्र तम्मन यांना तिकीटाची घोषणा केली आहे.
माजी आमदार शाम घाटगे यांचे तिकीट हुकले आहे.
आणखी 9 मतदारसंघात उमेदवार निवडणे अवघड आहे. बेळगाव उत्तर, कित्तूर, सौंदत्ती, बेळगाव दक्षिण, गोकाक, अरभावी, निप्पाणी, रायबाग, अथणी या मतदार संघात उमेदवारी निवडीचा पेच पक्षापुढे आहे. कारण या 9 मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटासाठी मोठी चुरस आहे.


Recent Comments