आमदार महेश कुमठल्ली यांच्या हस्ते 13 कोटी 48 लाखांच्या अनुदानातून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

अथणीचे आमदार महेश कुमठल्ली म्हणाले की, कोट्टलगी अम्माजेश्वरी सिंचन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 28 मार्च रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.
ककमरी ते महाराष्ट्र सीमा उमराणी या 3 कोटी खर्चाच्या, ककमरी ते रामतीर्थ महाराजांच्या शेतापर्यंत, कोकटनूर ते शिरहट्टी या 1 कोटी 41 लाख रुपये अनुदानातून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते ककमरी गावात बोलत होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सिंचन प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केलेले सहकार्य मी कधीही विसरणार नाही, असे ते म्हणाले.

अथणी मतदारसंघात 24 मार्च रोजी 13 कोटी 48 लाख रुपयांच्या अनुदानातून लोकाभिमुख व विकासाभिमुख प्रकल्प राबविण्यात आले आहेत. जैन समाजाच्या इमारतींसाठी 2 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून काही दिवसांत या इमारतींचे भूमिपूजन पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कंत्राटदार शिवानंद सिंदुर, गुरु पाटील, श्रीधर हंडी, व्यंकण्णा गौडा पाटील, गुरप्पा दाशाळ, श्रीशैल जनगौड, गिरीश बसरगी, रमेश धुमाळे, गिरीश सज्जन आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments