तिकीट जाहीर होताच बेळगाव काँग्रेसमध्ये मतभेदाचा स्फोट झाला असून, रामदुर्ग काँग्रेसचे तिकीट इच्छुक अर्जुन गुड्डद यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे.
तिकीट न मिळाल्याने पत्रकार परिषद घेऊन गुड्डद यांनी ताशेरे ओढले आणि अशोक पट्टण यांनी आपण येथे येत नसून वैयक्तिक सूड उगवत असल्याचा आरोप केला. आम्ही तिकीट मागितल्याने ते आम्हाला त्रास देत आहेत. अशोक पट्टण आमची माफी मागावी. अशोक पट्टण याना तिकीट कशाच्या आधारे दिले हे कळत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
तो काँग्रेसचा उमेदवार आहे पण मी बंडखोर उमेदवार आहे, विजयी होऊन अशोक पट्टण याना योग्य धडा शिकवू. रामदुर्गमधून , पाच जणांनी तिकीट मागितले आहे, पण त्यांनी मला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, पण उघडपणे नाही. सिद्धरामय्या यांनी 2018 च्या निवडणुकीमुळे आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे आणि अशोक पट्टण यांनी सिद्धरामय्या यांना तिकीट मिळवण्यासाठी ब्लॅकमेल केले आहे असा आरोप अर्जुन गुड्डद यांनी केला .


Recent Comments