Belagavi

सिंधी समाजाच्या वतीने चेतिचंद उत्सव-2023 उत्साहात

Share

बेळगावात सिंधी समाजाच्या वतीने स्वातंत्र्ययोद्धा हेमू कलानी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चेतिचंद उत्सव-2023 उत्साहात पार पडला.

बेळगावात गुरुवारी स्वातंत्र्ययोद्धा हेमू कलानी यांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्त पाटील गल्ली येथील स्वातंत्र्यवीर हेमू कलानी चौकात सिंधी समाजाच्या वतीने हेमू कलानी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी हिंडलगा रस्त्यावरील सिंधी कॉलनीतील सिंधी पंचायतीच्या सांस्कृतिक भवनात सिंधीयत सुरहान चेतिचंद उत्सव-2023 उत्साहात पार पडला.

यावेळी समाजातील मान्यवरांच्या हस्ते सिंधी समाजाचे महान संत झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध धार्मिक विधीही करण्यात आले. पूजा व आरतीनंतर बाईराणा साहिब कार्यक्रम झाला. त्यानंतर झुलन जी मौज कार्यक्रमात केएसपी श्री गंगानगर येथील लावी संधू यांनी विविध धार्मिक गीते, भजन सादर केले. यावेळी सिंधी समाजातील अनेक स्त्री-पुरुष भाविकांनी ठेका धरून फेर धरत नृत्य करण्याचा आनंद लुटला.

त्यानंतर लंगर महाप्रसाद पार पडला. यावेळी सिंधी पंचायत, बेळगावचे पदाधिकारी, सदस्य व सिंधी समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: