मानवी देह मृत्यूनंतर दफन किंवा दहन करण्यापेक्षा , वैद्यकीय संशोधनासाठी मेडिकल कॉलेजला दान करावा असे आवाहन केएलई श्री बीएमके आयुर्वेदिक मेडिकल युनिव्हर्सिटी, बेळगाव येथील शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महांतेश रामण्णावर यांनी केले .
गजेंद्रगड शहरातील म्हैसूर मठ येथे कर्नाटक मानवाधिकार जनसेवा संस्था आणि गदग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (GEEMS) यांच्या वतीने आयोजित शरीर, अवयव, नेत्र, त्वचा आणि रक्तदान शिबिरात त्यांनी व्याख्यान दिले.

याच प्रसंगी जेम्सच्या प्राध्यापक डॉ. रूपा बलिहल्लीमठ यांच्या मते, कॉर्मोरेशनची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या देहदानाबद्दलचे गैरसमज दूर करण्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात डॉ. गजानन चेन्नशेट्टी यांच्यासह अनेक डॉक्टरांनी रक्तदान, नेत्रदान, अवयवदान या वैशिष्ट्यांवर व्याख्याने दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार जी.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व ते म्हणाले की, देहदानाच्या भावनेवर अधिकाधिक जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावे. म्हैसूर संस्थान मठाचे अधिष्ठाता जगद्गुरु विजयमहंत महास्वामी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्य उपस्थिती लावून आशीर्वाद दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महांतेश गौडा पाटील होते आणि समारोप जेम्सच्या सहकार्याने जीवनातील आणि मृत्यूनंतरचे मानवी हक्क या विषयावर झाले. कलबुर्गीचे शिवानंद हुगार, मेटी, डॉ. शरणू गंगेर, मंजुळा रेवडी, महेंद्र जी, सिद्दैय्या हिडकीमठ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रम निदगुंडीकोप्प येथील अभिनव चेन्नबसव महास्वामी यांच्या हस्ते कालकालेश्वर, गजेंद्रगड या मुख्य मार्गावर देहदान ,अवयदान जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. या रॅलीत तालुक्यातील आशा वर्कर डॉ. जेरे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच जयश्री पवार, राजभक्षी दोड्डमणी, शंकर अवेर, शिवाप्पा बबली, लिन्नगौडा पाटील, अरुण उगलत, रेवणसिद्दप्पा हदिमनी, मानवाधिकार जनसेवा समितीचे प्रज्वल हेरकल यांनी सहभाग नोंदवून रॅली यशस्वीपणे पार पाडली .
यावेळी बोलताना डॉ . महांतेश रामण्णावर यांनी , देहदान ,अवयव दान ,त्वचादान आणि नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे . देहदान केल्याने , वैद्यकीय संशोधासाठी मदत होते तर अवयव दानामुळे एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म होऊ शकतो . त्वचादानामुळे भाजलेल्या व्यक्तींवच्या शरीरावर त्वचारोपण करता येते आणि नेत्रदानामुळे अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते .मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन किंवा दफन केल्याने , देहाची शेवटी माती होते . याउलट देहदान , अवयव दान , त्वचा दान आणि नेत्रदान केल्याने आपण आपल्या मृत्यूनंतर देखील एखाद्याला जीवनदान देऊ शकतो अशी जागृती त्यांनी केली .
मरणोत्तर देहदान केलेल्या दात्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पन्नासहून अधिक अवयव आणि देहांची नोंदणी यावेळी करण्यात आली आहे.


Recent Comments