Belagavi

हिंडलगा मराठा कॉलनीत उद्यानासाठी भूमिपुजन

Share

विविध भागात विभागलेल्या बेळगाव ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने अथक परिश्रम केले आहेत. मी पाच वर्षात केलेल्या कामाचा जिवंत पुरावा मतदारसंघातील जनता असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील हिंडलगा गावातील मराठा वसाहतीमध्ये नवीन उद्यान उभारणीसाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून 50 लाख रुपये जाहीर करण्यात आले. या अनुदानातून उद्यान उभारणीच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या .

लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “क्षेत्रातील नवीन कामांसाठी अनुदान आणताना कुणीही कष्ट घेतलेले नाहीत. पण मी जनतेचा पुढाकार घेऊन माझ्या सत्तेच्या पलीकडे अनुदान आणले आहे. जनतेने साथ दिल्यास काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होईल. आगामी निवडणुकीत मी निवडून येईन आणि सरकारचा एक भाग म्हणून आणखी सेवा करेन,” असे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

त्याचवेळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हिंडलगा गावातील जयनगरमध्ये नागरी विकास प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आलेल्या 32 लाख रुपयांच्या निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या , नवीन उद्यान उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या दोन्ही कार्यक्रमांना स्थानिक नागरिक, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, कपिल सांबरेकर, संजय कदम, राहुल उरणकर, चंद्रकांत गवीमठ, संजय मगदूम, दयानंद सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Tags: