Belagavi

बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीवर घालणार बहिष्कार

Share

बांधकाम विभागाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अन्यथा , बांधकाम कामगार निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा ऍड एन आर लातूर यांनी दिला आहे .

या संदर्भात बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांना माहिती देत होते . ते म्हणाले कि , २०१८ साली बांधकाम कामगारांना , घरे बांधण्यासाठी सरकारकडून , ५ लाख रुपये साह्यधन देण्याचा आदेश जरी करण्यात आला . मात्र जिल्हयातील २ लाख बांधकाम कामगारांपैकी एकालाही या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही . शिवाय ,विद्यार्थ्यांना अर्ज करून देखील सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही . फक्त १० ते २० % विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळत आहे . शिवाय कामगारविभागांकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये भ्रष्टाचार होत आहे . याची चौकशी व्हावी अन्यथा आगामी निवडणुकीवर बांधकाम कामगार बहिष्कार टाकतील असा इशारा ऍड . एन आर लातूर यांनी दिला .

समाजसेवक शिवाजी कागणीकर म्हणाले कि , सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरु केलेल्या योजनेनुसार लवकरात लवकर , गरजू बांधकाम कामगारांसाठी घर मिळण्याची व्यवस्था करावी तसेच कामगारांसाठी जो निधी राखीव आहे त्याचा उपयोग फक्त कामगारांसाठीच करावा अशी मागणी केली .

यावेळी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: