Khanapur

लोंढा चेकपोस्टवर 25 मिक्सर ग्राइंडर जप्त

Share

विनापरवानगी वाहतूक करण्यात येत असलेले 25 मिक्सर ग्राइंडर लोंढा चेकपोस्टवर जप्त करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना राजकीय पक्ष, उमेदवारांकडून विविध भेटवस्तू, आमिषांचे वाटप करण्यात येत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत.

त्यासाठी वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यातील लोंढा चेकपोस्ट जवळ 25 मिक्सर ग्राइंडर जप्त करण्यात आले असून ते परमिटशिवाय वाहतूक करण्यात येत होते. या मिक्सर ग्राइंडरची किंमत 70 हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.

Tags: