रणदीप सिंह सुरजेवाला यांनी आरक्षणाबाबत इतिहास वाचला पाहिजे . असा सल्ला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला
आपल्या कृष्णा या गृह कार्यालयात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मख्यमंत्री म्हणाले की, कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आरक्षणाबाबत बोलण्याचा काँग्रेसला नैतिक आणि राजकीय अधिकार नाही.
आरक्षणासाठी यापूर्वीच कायदा करण्यात आला असून त्यानुसार भरती आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. घटनेच्या अनुसूची 9 मध्ये समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. विधी विभागाने सल्ला घेऊन प्रक्रिया राबवली. ते म्हणाले की, शेड्युल 9 मध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.


Recent Comments