कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम देवता श्री बसवाण्णा देवालयाचा सालाबादाप्रमाणे होणारा जात्रामहोत्सव बुधवार दि.२२/०३/२३ रोजी गुढी पाढव्याच्या शुभमुहर्तावर देवस्थानी हक्कदार कमिटी पदाधिकारी,देवस्कि कमिटी पदाधिकारी,पुजारी व असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थित पारंपारिक विविध धार्मिक विधित हर हर महादेवच्या जयघोषात सहवाद्य गावातील सर्व सजवलेल्या बैलजोड्यांसह मोठ्या भक्तीभावात व आनंदोत्साहात संपन्न झाला.कडोलीच्या या बसवाण्णा देवाच्या जात्रोत्सवामध्ये सजवलेल्या बैलजोड्यांचे मंदिर प्रदर्शना व धार्मिक विधी पहाणार्यांच्या डोळ्यांचे पारणे पेढणारे दृश्य होते.
तत्पुर्वि रात्री श्री कल्मेश्वर भजन मंडळाच्यावतीने भजन सेवा तर देवस्कि कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने अंबिल तयार केले गेले. नंतर पहाटे मंदिर व देव स्वच्छता करुन अभिषेकसह विधिवत पूजा करण्यात आले.
नंतर दिवसभर भाविकांचे देव दर्शनासह नारळ वाढवणे सुरु होते. नंतर दुपारचे साडे तिन नंतर सहवाद्य देवस्थानी हक्कदार कमिटी,देवस्कि पंच कमिटी व पुजार्यांच्या उपस्थित गावातील सर्व देवदेवतांची पुजा व पंचांग वाचन झाल्यानंतर परत सहवाद्य संध्याकाळी सहाच्यासुमारास बसवाण्णा मंदिर समोर जमल्यानंतर पारंपारिक धार्मिक विधीसह गार्हाणे घालुन मुख्य पूजा विधी केल्यानंतर खर्या अर्थाने मुख्य जात्रेला सुरुवात होऊन भाविकांची गर्दी होऊन अंबिल प्रसाद स्वीकारणे नारळ वाढवणे,दर्शन,सजवलेल्या बैलजोड्यांसह गुग्गर्या वाटत पाच मंदिरप्रदर्शनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली. नंतर दुसर्या दिवशी सालाबादाप्रमाणे होणार्या कुस्त्या यावर्षी मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येणार असल्याने पैलवान शोधणे,जोडया जमवणे यामुळे यंदाच्या कुस्त्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे कडोली कुस्ती संघटनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
१ देवस्थानी पंच कमिटी पदाधिकारी,देवस्थानी हक्कदार कमिटी पदाधिकारी,पुजारी व असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थीतीमध्ये जेष्ट व धार्मिक विधीचे अत्यंत अनुभवी आणि हक्कदार कमिटीचे अध्यक्ष श्री मधु पाटील यांचे गार्हाणे घालण्यासह जात्रोत्सवाच्या मुख्य धार्मिक विधी चालु असतांना.
२ सहवाद्य सजवलेल्या बैलजोडीसह गुग्गर्या वाटत मिरवणूक व मंदिर प्रदर्शना सुरु असतांना
४ अंबिल प्रसाद वाटप चालु असतांना
५ भाविकांचे दर्शन व नारळ वाढवणे सुरु असतांना.
बाईट्स:देवस्थानी हक्कदार कमिटीचे अध्यक्ष व गावचे अत्यंत अनुभवी जेष्ट धार्मिक विधीचे सखोल जानकार श्री मधु पाटील बोलतांना.
स्थळ:कडोली
दि:२३/०३/२३.


Recent Comments