राजहंसगड येथे परंपरेनुसार यावर्षीही मोठ्या उत्साहात गुढी पाडवा उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला, सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

सर्वप्रथम सिद्धेश्वर मंदिरात विधिवत पुजा अर्चा करण्यात आली त्यानंतर नामकरण व तुलाभराचा कार्यक्रम झाला .
तसेच गावातील व यरमाळ येथील भाविकांनी आपल्या बैलांची सजावट व रंगरंगोटी करून जोड्या जुंपल्या होत्या , मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर गडावरच्या बुरुजावरुन नारळ उडविण्याचा कार्यक्रम पार पाडला.
हा संपूर्ण सोहळा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी व श्री सिद्धेश्वर देवस्थान किल्ला ट्रस्ट कमिटी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पंच कमिटी अध्यक्ष लक्ष्मण थोरवत, किल्ला ट्रस्ट कमिटी अध्यक्ष रामचंद्र गडकरी उपाध्यक्ष बाळू इंगळे, शिवपुत्रय्या बुर्लकट्टी, सेक्रटरी बसवंत लोखंडे,खजिनदार मारूती इंगळे,गुरूदास लोखंडे,पी जी पवार, बसवंत पवार,हणमंत नावगेकर,ग्रामपंचायत सदस्य जोतिबा थोरवत,सुरेश थोरवत चंद्रकांत हावळ, बुद्धाजी इंगळे,हुवाणी बोंगाळ गणपत जाधव, महेश कुंडेकर,महादेव चव्हाण, नानाजी लोखंडे, रामा हावळ, रामा इंगळे, कृष्णा यळेबैलकर,उपस्थित होते


Recent Comments