Banglore

चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारः मुख्यमंत्री बोम्मई

Share

आज निधन झालेल्या श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ येथील परमपूज्य जगद्गुरू कर्मयोगी स्वस्तीश्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यावर जैन परंपरेनुसार पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ येथील परमपूज्य जगद्गुरू कर्मयोगी स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. त्यांचे जाणे ही कधीही भरून न येणारी हानी आहे आणि मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो. देव त्यांच्या असंख्य भक्तांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

Tags: