संकेश्वर आणि हुक्केरी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत घरफोडीप्रकरणी एका सराईत घरफोड्याला अटक करून 11,18,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संकेश्वर आणि हुक्केरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या आणि चोऱ्या केल्याप्रकरणी दोन्ही स्थानकाचे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मिळालेल्या धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. २८ वर्षीय फकीरप्पा गंगाप्पा कांबळी, रा. लक्ष्मेश्वर,
जी. गदग असे या सराईत घरफोड्याचे नाव आहे. या आरोपीला अटक
करून 169 ग्रॅम सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 11,18,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यावरून संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार तर हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार प्रकरणे उघडकीस आली आहेत.
Recent Comments