Hukkeri

हुक्केरी शहरात २४ मार्च रोजी युवा संमेलन

Share

हुक्केरी शहरात 24 मार्च रोजी होणाऱ्या युवा संमेलनात 15 हजारांहून अधिक युवक सहभागी होणार आहेत.असे हुक्केरी विद्युत सहकारी संघाचे संचालक पृथ्वी रमेश कत्ती यांनी सांगितले .

हुक्केरी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना , चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या युवा संमेलनाला , भारतीय भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या आणि तामिळनाडूच्या अण्णामलाई उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 600 तरुण येतील.
परिषदेत हुक्केरी तालुक्यातील कणगळा परिसरात उमेश व्ही कत्ती यांच्या प्रयत्नातून 1000 एकर औद्योगिक वसाहतीमध्ये , 200 एकरात , काच कारखाना उभारण्यात येत असून युवकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने या परिषदेत,राबविण्यात येणारे प्रकल्प, मेक इन इंडिया आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा प्रज्वल निलजगी यांनी सांगितले , संमेलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम होणार असून सर्व घटकांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यशस्वितेचे आवाहन केले.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष रचैय्या हिरेमठ, मोर्चा उपाध्यक्षा सुहास नूली. प्रभाकर हंचनाळे, हलप्पा गडवर, नगरसेवक राजू मुन्नोली, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे संचालक अशोक पट्टणशेट्टी , बसवराज मरडी, सुरेश दोडलिंगन्नवर, गुरु कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Tags: