Belagavi

बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघातर्फे राज्यस्तरीय क्रिकेट्स्पर्धा : जितेश कब्बूर

Share

बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघातर्फे येत्या 24 व 25 मार्च रोजी युनियन जिमखाना मैदानावर कर सल्लागारांची राज्यस्तरीय क्रिकेट्स्पर्धा आयोजित केली आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघाचे अध्यक्ष जितेश कब्बूर यांनी ही माहिती देऊन सांगितले की, कर सल्लागारांचे काम किचकट असते. त्यांना रोजच्या दगदगीच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा यासाठी बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघातर्फे येत्या 24 व 25 मार्च रोजी युनियन जिमखाना मैदानावर होणाऱ्या राज्यस्तरीय कर सल्लागार क्रिकेट स्पर्धेत राज्यातील बेंगळूर, हासन, गदग, धारवाड, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा आणि यजमान बेळगावसह एकूण 12 संघ भाग घेणार आहेत.

गेली 3 वर्षे आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले होते. कोविडमुळे 2 वर्षे स्पर्धा घेता आली नव्हती. यंदापासून पुन्हा स्पर्धा घेत आहोत. पहिल्या दिवशी 6 सामने होणार असून, दुसऱ्या दिवशी उपांत्य आणि अंतिम सामना होणार आहे. सामने पाहण्यासाठी सगळ्यांना खुला प्रवेश आहे. यंदा राज्य कर सल्लागार संघाला 50 वर्षे पूर्ण झाली असून, रौप्यमहोत्सवानिमित्त यावर्षी भव्य पद्धतीने आयोजन केले आहे. शनिवारी संघाच्या सदस्यांसाठी ऑर्केस्ट्रा संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राप्तीकर खात्याचे अधिकारी मुरुगेंद्र पाटील, महेशबाबू, यास्मिन उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही जितेश कब्बूर यांनी दिली.

यावेळी बेळगाव जिल्हा कर सल्लागार संघाचे क्षेत्रीय उपाध्यक्ष महांतेश दाडीगोंडे, माजी अध्यक्ष बसवराज अनगंडी आदी उपस्थित होते.

Tags: